स्कूलबसमध्ये गिअर ऐवजी बांबू

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

सांताक्रूझ येथील एका शाळेच्या बसमध्ये गिअरऐवजी लाकडी बांबू लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी या बसने एका कारला धडक दिली. या घटनेनंतर खार पोलिसांनी या बसचालकाला अटक केली.
सांताक्रूझ येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या बस वर राजकुमार चालक म्हणून काम करतो. मंगळवारी राज कुमारच्या बसने कारला धडक दिली. कार चालकाच्या तक्रारीवरून खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासणी दरम्यान लाकडी बांबूने गिअर टाकले जात असल्याचे आढळले. गिअर बॉक्स मध्ये बिघाड झाल्यामुळे बांबूचा वापर केल्याचे चालकाने सांगितले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत