स्टेट बँकेकडून ठेवींवरील व्याजदरात वाढ

मुंबई : रायगड माझा वृत्त 

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने मुदत ठेवींवर अधिक व्याज देऊ केले आहे. विविध मुदतीच्या ठेवींवर बँकेने 0.05-0.10 टक्क्याची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने चालू वर्षात तिसऱ्यांदा मुदत ठेवींवरील व्याजदर वाढविले आहेत. नवीन व्याजदर आजपासून (बुधवार) लागू होणार आहेत.

स्टेट बँकेने बुधवारी घेतलेल्या निर्णयात, एक वर्षांहून अधिक मुदतीच्या गटातील ठेवींवरील व्याजदर 0.05 टक्क्याची वाढ केली आहे. एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मात्र एक ते दोन वर्षांपर्यंतच्या मुदतीकरिता वार्षिक 6.8 टक्के व्याजदर लागू करण्यात आला आहे, तर तीन ते पाच वर्षे मुदतीकरिता 6.8 टक्के व्याजदर मिळेल. पाच ते दहा वर्षे मुदतीच्या ठेवींवर 6.85 टक्के व्याजदर असेल.

ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर आजपासून सुधारित व्याजदरांप्रमाणेच असतील. आता त्यावर वार्षिक 7.3 टक्के दराने व्याज मिळेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत