स्थानिकांच्या न्यायहक्कांसाठी जेएनपीटी चौथ्या बंदरावर शिवसेनेचा मोर्चा.

उरण : विरेश मोडखरकर

उरणमधील स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तानच्या प्रश्नांसाठी शीवसेनेने आज जेनपिटीच्या चौथ्या बंदरावर मोर्चा काढला. तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे स्थानिकांबाबत निर्माण होणारे धोके याविरोधात जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. याअनुषंगाने येथील स्थानिकांना नोकरभरातीमध्ये सामावून घेण्यासाठी मोर्चाची आग्रही मागणी होती.

उरण तालुका शिवसेनेने आज जेएनपीटीच्या नव्याने झालेल्या चौथ्या बंदरावर धडक मोर्चा काढत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी चौथ्या बंदरातील कामकाज बंद करण्यात आले होते. मोर्चाचे नेतृत्व खासदार श्रीरंग बारणे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे, आमदार मनोहर भोईर, सल्लागार बाबनदादा पाटील यांनी केले. तर यावेळी जेएनपीटी आणि केंद्रासारकारच्या माध्यमातून स्थानिकांवर अन्याय केला जात असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी सांगितले. लढा हा स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. स्थानिकांना न्याय मिळत नसेल तर येथे येणाऱ्या परप्रांतीयांना प्रकल्पामध्ये जाऊदेणार नाही असा इशाराही आमदार मनोहर भोईर यांनी यावेळी दिला असून, शिवसेना स्थानिकांवरी अन्याय कदापि सहन करणार नसल्याचे भोईर यांनी म्हटले आहे.

स्थानिकांवर होत असणाऱ्या अन्यायाविरोधातील लढे हे राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी लढत असल्याचे येथील जनता समजून चुकली असल्याने, पक्षीय मोर्चांमधील संख्या मात्र कमी झाल्याचे चित्र या मोर्चाच्या अनुषंगाने दिसून आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत