स्फोटात तीन कामगारांचा जागीच  मृत्यू 

एक कामगार गंभीर जखमी ;वाड्यातील तोरणे येथील घटना

वाडा : रायगड माझा 

या गावाच्या हद्दीतील ‘तोरणे इस्पात ‘या लोखंड
बनविण्या-या कंपनीत आज सायंकाळच्या सुमारास भट्टी मध्ये स्फोट होऊन झालेल्या अपघातात तीन कामगारांचा भाजून जागीच मृत्यू झाला.तर एक कामगार गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
निलेश यादव (वय 28) संजय  गुप्ता( 27) सनी वर्मा ( 28 )अशी मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. तर विनोद यादव  (35) हा कामगार गंभीर जखमी आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,वाडा तालुक्यातील  तोरणे गावाच्या हद्दीत ‘तोरणे इस्पात उद्योग  प्रा  लिमिटेड’ ही कंपनी आहे.या कंपनीत लोखंडाच्या  कच्च्या माल ( स्क्रॅप) वितळवून लोखंडी राॅड(  इंगोट)तयार केले जातात. यासाठी भट्टी गरम केली  जाते.आज सायंकाळच्या सुमारास भट्टी गरम करून  राॅड तयार करण्याचे काम सुरू असतानाच अचानक  भट्टी लिकेज होऊन भयंकर स्फोट झाला. या  स्फोटाचा आवाज इतका भयंकर होता की आजुबाजुच्या  परिसरात जोरदार आवाज झाला नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले. या स्फोटात  लोखंडाचा तप्त ज्वाला रस कामगारांच्या अंगावर पडल्याने ते भयंकर भाजले. यात निलेश यादव, सनी वर्मा, संजय गुप्ता या  तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर विनोद यादव हा  गंभीर  जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी ठाणे येथील साम्रान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत