स्वखर्चातून आमदार महेंद्र थोरवेंकडून खालापूर शहरातील दोन आदिवासी वाड्यांना पाण्याच्या टाक्या

खालापूर : समाधान दिसले

आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद

खालापूर नगरपंचायत हद्दीतील काही आदिवासी वाड्यापैकी शिरवलीवाडी आणि मठाचीवाडीतील ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना दोन – तीन किलोमीटरवर चालत जाऊन डोक्यावर हंड्याने पिण्यास पाणी आणावं लागत असताना येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन कर्जत – खालापूरचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी स्वखर्चाने शिरवलीवाडी आणि मठाचीवाडी येथे तीन हजार लीटरच्या दोन टाक्या देऊन येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण कमी करण्याचा प्रयत्न केल्याने येथील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला असून या टाक्याचे 17 एप्रिल रोजी शिवसेना नेते रोहित विचारे व बिपिनदादा घाटवल यांच्या हस्ते उघ्दाटन करण्यात आले.

कर्जत – खालापूर मतदार संघातील काही वर्षापासून अनेक वाड्यांवरील ग्रामस्थांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत असताना आमदार महेंद्र थोरवेंनी आपल्या आमदारकीच्या दिड वर्षाच्या काळात असंख्य वाड्यावस्तीवर समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना खालापूर नगरपंचायत हद्दीतील शिरवलीवाडी आणि मठाचीवाडीतील ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याची समस्या आमदार थोरवेंनी गांभीर्याने घेत स्वखर्चातून तीन हजार लिटरच्या दोन टाक्या देत येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण कमी करण्याचा प्रयत्न केला.

त्या टाक्यांमध्ये पाण्याची व्यवस्था शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार नवीनदादा घाटवळ ह्यांनी स्वतःच्या बोरिंग मधून दिल्याने येथील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. तर या दोन्ही टाक्याचे उघ्दाटन 17 एप्रिल रोजी 17 एप्रिल रोजी शिवसेना नेते रोहित विचारे व बिपिनदादा घाटवल यांच्या हस्ते करण्यात आले.

या उघ्दाटन सोहळ्याने दोन्ही वाड्यातील महिलांनी समाधान व्यक्त करून पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवल्याने आमदार महेंद्रशेठ थोरवे व शिवसेना जिल्हा सल्लागार नविनदादा घाटवल याचे ग्रामस्थांनी व महिला वर्गांनी आभार मानले. याप्रसंगी युवानेते रोहित विचारे, जेष्ठ शिवसैनिक बिपीन घाटवळ, अवधूत भुर्के, भोसले ताई, नितिन पाटिल, निखिल मिसाळ, अमित जगताप, स्वप्नील खराळ, पवार दादा, प्रफुल खडकबाण आदी प्रमुखासह खालापूर शहरातील सर्व जेष्ठ शिवसैनिक, सर्व आजी – माजी पदाधिकारी, युवासैनिक आणि ग्रामस्थ – महिला वर्ग उपस्थित होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत