स्वबळाचा नारा देणारे युतीची बोलणी का करतात? मनसेचा खडा सवाल

मुंबई : रायगड माझा वृत्त
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची युतीसंदर्भात फोनवरुन चर्चा झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. स्वबळाचा नारा देणारे युतीची बोलणी का करतात? असा रोखठोक सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि आगामी निवडणुकांसाठी जागावाटपाबाबत चर्चा केली. या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी ‘मोठय़ा भावा’चा आग्रह कायम ठेवत, 1995 च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव अमित शाहांपुढे ठेवला आहे. या प्रस्तावावर मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“स्वबळाचा नारा देणारे युतीची बोलणी तरी का करत आहेत? असा सवाल विचारात हे ट्वीट खास माझ्याशी नेहमी भांडण्याऱ्या, पण माझ्यावर मनापासून प्रेम करण्याऱ्या शिवसेनेच्या मित्रांना अर्पण करत आहे.” असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या ‘रोखठोक’ सवालामुळे आता पुन्हा मनसे विरुद्ध शिवसेना असा ‘सामना’ रंगण्याची शक्यता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत