स्वयंरोजगारातून महिलांनी सक्षम व्हावे, बोर्लीपंचतन सरपंच गणेश पाटील यांचे आवाहन

 श्रीवर्धन : श्रीकांत शेलार

चौदाव्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीतून महिला सबलीकरण साठी ठराविक रक्कम खर्च करण्याची तरतूद आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन ग्रामपंचायत ने रायगड जिल्ह्यातील जनशिक्षण संस्थान ला 48 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला असल्याचे या कार्यक्रमात सरपंच गणेश पाटील यांनी सांगितले.

पूर्वी ‘चूल आणि मूल’ एवढंच कार्यक्षेत्र असलेल्या महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. सावित्रीबाई फुलेंचा आदर्श पूढे ठेवून आणि त्यांची प्रेरणा घेऊन अनेक महिला आज यशाची शिखरे गाठत आहेत. ग्रामीण भागातील महिलासुद्धा याला अपवाद नाहीत. अनेक क्षेत्रात ग्रामीण महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. संस्थान देणार असलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून व त्यातून मिळणाऱ्या स्वयंरोजगारातून महिलांनी सक्षम व्हावे, असे आवाहन सरपंच गणेश पाटील यांनी केले आहे.

अलिबाग येथील जनशिक्षण संस्था ही महिलांना मूलभूत व स्वयंरोजगार शिक्षण देण्याचे कार्य करत आहे. फॅन्सी बॅग बनवण्यासाठी चे प्रशिक्षण ही संस्था देणार असून त्याचा कालावधी 60 तास अर्थात 30 दिवस इतका आहे. राज्यात प्लास्टिक बंदी आहे. त्यामुळे कापडी पिशव्यांना मोठया प्रमाणात मागणी आहे. या स्वयंरोजगार तुन महिलांना आर्थिक सबलीकरणासाठी मदत होणार आहे. सध्या या प्रशिक्षण वर्कशॉप मध्ये 18 जणींनी सहभाग घेतला आहे. आणखी इच्छूक महिलांनी सहभागी होण्यासाठी बोर्लीपंचतन ग्रामपंचायत मध्ये संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला सदस्य सुषमा सुधीर दिवेकर मंजिरी उत्तम दिवेकर,प्रियांका दत्तप्रसाद मुरकर,सायली शंकर गाणेकर,पोलिस पाटील उदेश्य वाग्जे तर प्रशिक्षक शिक्षक सौ.वीप्राली विकास पुसाळकर प्रोग्राम असिस्टंट गौरी स्वप्नील करडे आदी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत