स्वातंत्र्यदिनानिमित्त गुगलच्या डूडलच्या माध्यमातून शुभेच्छा

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

आज आपल्या देशाचा ७२ वा स्वातंत्र्यदिन असून गुगलने यानिमित्त खास डुडल साकारून तमाम देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशातील ट्रकवर करण्यात येणारी कलात्मक सजावट पाहण्यासारखी असते. गुगलने त्याचाच आधार घेत हे डुडल साकारले आहे. राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय फुल, राष्ट्रीय फळ या डुडलमध्ये दाखवण्यात आले आहे.

गुगलने साकारलेल्या या डुडलमध्ये राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय फुल कमळ आणि राष्ट्रीय फळ आंबा, उगवता सूर्य तसेच हत्तीचे चित्र दाखवले आहे. आपला भारत देश रस्त्यांनी जोडला गेला आहे. लांब पल्ल्याच्या दौऱ्यावर आपल्या घरापासून दूर असलेले ट्रक चालक आपल्या घराप्रमाणे ट्रक सजवतात. अनेकदा हे ‘ट्रक आर्ट’ सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत