स्वातंत्र्यलढ्यात जिनांचं योगदान मोठं-शत्रुघ्न सिन्हा

छिंदवाडा: रायगड माझा वृत्त

भाजपातून काँग्रेसमध्ये सामील झालेले शत्रुघ्न सिन्हा यांनी मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मोहम्मद अली जिना यांनी देशाच्या स्वातंत्र्यात मोठं योगदान दिलं आहे, असं वादग्रस्त विधान केले आहे.

सौसर या गावात झालेल्या या सभेत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘काँग्रेस परिवारात महात्मा गांधींपासून सरदार वल्लभभाई पटेलपर्यंत, मोहम्मद अली जिनांपासून जवाहरलाल नेहरूंपर्यंत इंदिरा गांधींपासून राजीव गांधी, राहुल गांधींपर्यंत देशाच्या योगदानात वाटा आहे. देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचं हे योगदान असल्यामुळेच काँग्रेसमध्ये आलो.’

‘काँग्रेसमध्ये आलोय ते पहिलं आणि शेवटचं. इथून मागे फिरणार नाही,’ असंही ते म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत