हनिमूनला निघालेल्या दाम्पत्यावर पसरणी घाटात हल्ला,नवऱ्याचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर : रायगड माझा 

एक धक्कादायक बातमी महाबळेश्वरहून आलेली. महाबळेश्वरला हनिमूनसाठी निघालेल्या नवदाम्पत्यावर पसरणी घाटात जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.  पाचगणीच्या पसरणी घाटात बायकोच्या समोर नवऱ्यावर वार करून हल्लेखोरांनी खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घाटात पत्नीचे दागिने हिसकवणाऱ्या हल्लेखोरांला रोखताना या हल्लेखोराने आनंद कांबळेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले, या हल्ल्यात आनंद कांबळेचा जागीच मृत्यू झाला आहे.

महाबळेश्वरला दरवर्षी हजारो पर्यटक जातात. जे राज्य एकेकाळी कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये देशात पुढे होतं, त्या राज्यात आज गुन्हेगारीमुळे काही दिवसच झालेले संसार उद्ध्वस्त होतायेत.

औंधला राहणाऱ्या आनंद कांबळे आणि दीक्षा कांबळे यांचं 20 मे रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर पहिल्यांदाच ते फिरण्यासाठी महाबळेश्वरला निघाले होते. त्यांचा सोबत आणखी एक जोडपे सुद्धा होते. वाईहून पाचगणीच्या पसरणी घाटातून जात असताना दीक्षा यांना उलटीचा त्रास होऊ लागला म्हणून गाडी थांबवण्यात आली. याच वेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी दीक्षाच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्याला आनंद यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हल्लेखोरांनी आनंदच्या डोक्यात चाकूने वार केले. यावेळी हा प्रकार  बघून सोबत आलेले दुसरे जोडपे गाडीत बसून पाचगणीच्या दिशेला पळून गेले .ते पोलिसांना घेऊन परत आले तोपर्यंत उशीर झाला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत