हरयाणात अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार

फतेहबाद : रायगड माझा ऑनलाईन 

हरयाणामध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फतेहाबादमधील ही घटना असून नराधमांनी तिचे आधी अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार केले. पीडितेच्या आईने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा अल्पवयीन मुलगी झोपली होती. त्यानंतर ती काही कामासाठी उठली तेव्हा गावातील दोन तरुणांनी तिचे अपहरण केले. एका निर्जन ठिकाणी तिला नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सदर आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत