हळदी निमित्त नवरदेवांनी दिली पुस्तकांची भेट ! कपडे वाटण्याची परंपरा काढली मोडीत ; सर्व स्तरातुन होतय कौतुक .

कोलाड – कल्पेश पवार
                      सध्या सर्वत्र हळदी -लग्नसमारंभ सुरू आहे,यानिमित्त परंपरागत सुरू असलेली लग्न-हलदित कपडे वाटण्याची परंपरा कापसे मुठली येथील तरुण हरेश कापसे यांनी मोडीत काढली असून हलदी कार्यक्रमाला येणाऱ्या नातेवाईक व पाहुण्यांना त्यांनी शर्टपीस न वाटता नवरदेवांनी  विवीध सामाजिक,धार्मिक पुस्तके समाजाला अर्पित केली आहेत.त्यामुळे या उच्च शिक्षित तरुणाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
                ग्रामीण सह शहरी भागात सर्वत्र दळदी -लग्नसमारंभ सोहळ्याची धामधूम सुरू आहे.असाच एक लग्न सोहळा रोहे तालुक्यातील कापसे मुठवली येथे 30 एफ्रिल रोजी पार पडला .या हळदी व लग्नसोहळल्या साठी आलेल्या सर्व नातेवाईक व पाहुण्यांना नवरदेव  हरेश कापसे व त्यांचे शिक्षकी पेशा असलेले मोठे बंधू अजय कापसे यांनी शर्टपीस ,व ईतर काही वस्तुनचे वाटप न करता  ही परंपरा मोडीत काढीत
डॉ बाबा आमटे,शिवचरित्र ,तसेच विविध सामाजिक धार्मिक,वैचारिक पुस्तके समाजाला भेट दिली आहेत.त्यामुळे या दोन्ही बंधूंचे कार्य नकीच समाजात प्रेरणादायी असून यांचे सर्वस्थरातून कौतुक होत आहे.
                   आमचे प्रतिनिधी यांनी नवरदेवाची प्रत्यक्ष  भेट घेतली असता ते म्हणाले की आज समाज लग्न -कार्यात लाखो रुपयांच्या कपड्याची उधळण करीत आहे .आणि हे कपडे आपण कधी वापरत सुद्धा नाही, त्यामुळे हा खर्च नाहक असल्याने  व आजच्या काळात  या कपड्याची नाही तर थोर विचारवंतांच्या विचारांची गरज समाजाला असल्याने या थोर विचारवंतांचे विचार लोकांपर्यंत पोचावेत याचं उद्देशाने आह्मी ही पुस्तकांची अनोखी भेट लग्नसमारंभ कार्यक्रमात अर्पण केली आहे .ही पुस्तके वाचून नकीच समाजात परिवर्तन घडेल ही अपेक्षा नवरदेवांनी व्यक्त केली .
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत