हातात रिव्हॉल्वर आणि रायफल घेऊन भाजप आमदाराचा डान्स

उत्तराखंड : रायगड माझा वृत्त 

वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे उत्तराखंडमधील खानपूरचे भाजप आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन पुन्हा एका सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. शिस्तभंगाच्या आरोपांनंतर भाजपने त्यांना निलंबित केलं होतं. परंतु कुंवर प्रणव सिंह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात आमदार महाशयांचा रंगेलपणा दिसत आहे.

आमदार कुंवर प्रणव सिंह गाण्यावर एका हातात एक-दोन नाही तर तीन रिव्हॉल्वर आणि दुसऱ्या असॉल्ट रायफल नाचवत आहेत. या व्हिडीओमध्ये कुंवर प्रणव सिंह एक एक करुन शस्त्र आपल्या हाती घेत आहेत. यासोबतच दारुही पिताना दिसत आहेत. तसंच अपशब्दही उच्चारत आहेत. या व्हिडीओमध्ये आमदार कुंवर प्रणव सिंह यांच्यासोबत आणखी काही लोक दिसत आहेत. ते देखील नाचत आहेत, गात आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत