हार्दिक पांड्या, लोकेश राहुल आणि करण जोहर विरोधात गुन्हा दाखल

जयपूर : रायगड माझा ऑनलाईन 

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये महिलांबाबत केलेले आक्षेपार्ह विधान हार्दिक पांड्या, लोकेश राहुल आणि करण जोहर यांना चांगलेच महागात पडताना दिसत आहे. या प्रकरणी राजस्थानमधील जोधपुरमध्ये या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिसेंबर 2018 मध्ये करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल या भारतीय क्रिकेटपटूंविरोधात बीसीसीआयने कारवाई देखील केली होती. या कारवाईनंतरही लोकांचा या तिघांवरील राग शांत झालेला नाहीये. यामुळे तक्रारीनंतर या तिघांवर नव्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एनआयए या वृत्तसंस्थेने दिलेल्या महितीनुसार तिघांविरोधात जोधपुरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत