हार्बर रेल्वेवरील वाहतूक ठप्प; सीवूड्स – बेलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडे

नवी मुंबई : रायगड माझा वृत्त

सोमवारी (1 ऑक्टोबर ) सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. हार्बर रेल्वे मार्गावर सीवूड्स ते बेलापूर स्थानकादरम्यान अप मार्गावर रुळाला तडे गेल्याची घटना समोर आली आहे.  9.45 वाजता ही घटना घडली. यामुळे सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

आठवड्याच्या सुरुवातीलाच हार्बर रेल्वे मार्गावर हा बिघाड झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. ऑफिस कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना लोकल बिघाडामुळे कामावार पोहोचण्यास उशीर होणार आहे. सीवूड्स ते बेलापूर मार्गावर रुळाला तडे गेले असल्याने रेल्वे प्रशासनाकडून तातडीने याची दखल घेण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत