हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत

रायगड माझा वृत्त

हार्बर रेल्वेवरील प्रवाशांना बुधवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मनस्तापाचा सामना करावा लागला. मुंबईवरुन वाशी- पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली असून वडाळा स्थानकात बेलापूर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे.

हार्बर रेल्वेवर वडाळा स्थानकात बुधवारी सकाळी बेलापूर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे वाशी- पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. या बिघाडामुळे मुंबई सीएसएमटीवरुन वाशीला जाणारी एक लोकल ट्रेन रद्द करण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत