हाळफाटा-पळसदरी मार्गे कर्जत रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम प्रगतीपथावर; प्रवास वर्गामध्ये समाधान

खोपोली :समाधान दिसले

खालापूर तालुक्यातील बहुतांशी रस्त्याची झालेली अवस्था पाहता या मार्गावरून प्रवास करणे वाहन चालकांना व प्रवासी वर्गाला कष्टमय बनल्याने प्रवासी वर्गाचा प्रवास सुखाचा व्हावा या दृष्टीने शासनाने बहुतांशी रस्त्याच्या नुतनीकर ण व दुरुस्तीकरीता निधी उपलब्ध करुन दिल्याने काही ठिकाणी दुरुस्ती, नुतनीकरणाच्या कामांना वेग मिळाला आहे. अशाच तालुक्यातील काही वर्षापासुन खड्ड्याचा मार्ग म्हणून ओळख हाळफाटा, पळसदरी मार्गे कर्जत रस्त्याची होती. या मार्गावरून प्रवास करणे प्रवासी, वाहन चालकांना जिकरीचे बनले होते, मात्र या मार्गाच्या नुतनीकरणाकरीता शासनाने एम.एस.आर.डी.सी.च्या माध्यमातून  कॉक्रीटीकरणाकरीता निधी गेल्या महिन्याभरापूर्वी उपलब्ध करून दिल्यानंतर या संदर्भात टी.अँड.टी.इंप्रा लिमिटेड, पुणे या कंपनीला रस्ता नुतनीकरण कामाचा ठेका दिल्याने गेल्या काही दिवसापासून रस्ता नुतनीकरणाच्या कामांनी दिवस रात्र वेग घेतल्याने रस्ता नुतनीकरणाचे काम प्रगतीपथावर असल्याने प्रवास व वाहन चालकांमध्ये आनंद वातावरण आहे. येत्या काही महिन्यातच हा मार्ग कॉक्रीटीकरण झाल्यानंतर खड्डेमुक्त होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

हाळफाटा, डोळवली, केळवली मार्गे पळसदरी, कर्जत मार्गावरुन दररोज अनेक शाळेय बसेस – कार तसेच पर्यटक, चाकरमानी, परिसरातील नागरिक खोपोली, पाली, पनवेल, कर्जत व अन्य शहराकडे वाहनांनी कायमच प्रवास करित असल्याने या मार्गावर मोठी वाहनांची ये – जा असते. मात्र हा रस्ता गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर खचल्याने खड्डेमय बनला होता, त्यामुळे प्रवासी व वाहन चालकांमध्ये नाराजीचा सूड उमटत होता. शाळकरी विद्यार्थी, चाकरमानी, प्रवासी, पर्यटक व वाहन चालकांना खड्ड्यामुळे होणार त्रात लक्षात घेऊन शासनाने एम.एस.आर.डी.सी.च्या माध्यमातून रस्ता क्रॉक्रिटीकरण नुतनीकरणाकरीता निधी उपलब्ध करून दिला आहे. तर या मार्गाचे क्रॉक्रीटीकरणाचा ठेका टी.अँड.टी.इंप्रा.कंपनी पुणे दिल्यानंतर या ठेकेदाराने तातडीने नुतनीकरणाच्या कामाला सुरुवात करीत शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीत काम करण्याच्या उद्देशाने दिवस रात्र काम सुरू ठेवत असून रस्ता नुतनीकरणाचे काम प्रगतीपथावर असल्यामुळे हा मार्ग लवकरच खड्डे मुक्त होऊन प्रवास सुखकर बनणार असल्याने सर्वामध्ये समाधान व्यक्त करीत आहेत.

टी.अँड.टी.इंप्रा कंपनी पुणेच्या व्यवस्थापनाकडून आपले मत मांडताना हा मार्ग उत्तम दर्जाचा निर्माण करण्यात येत आहे, तर रस्त्याचे नुतनीकरण करत असताना प्रवासी व वाहन चालकांच्या सुरक्षाबाबत काळजी घेतली जात असून शासनाने ठरवून दिलेल्या काळावधीच्या आत या मार्गाच्या क्रॉक्रीटीकरणाचे काम करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.

_व्यवस्थापक
टी.अँड.टी.इंप्रा कंपनी

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत