हाळ आदिवासी वाङीतील महिलांची हंङाभर पाण्यासाठी हायवेवर कसरत

खालापूर : मनोज कळमकर 

चार मोठ्या धरणांचा तालुका असलेल्या खालापूरातील हाळ आदिवासी वाङीतील कुटूंबाना पिण्याचे हंङाभर पाण्यासाठी मुंबई पूणे राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जावे लागत असून दररोजची हि जीवघेणी कसरत थांबण्यासाठी आता फक्त पाऊसच मदतीला धावून येणार आहे.
फेब्रुवारी नंतर खालापूर तालुक्यातील अनेक गावात व वाङीवस्तीवर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते.तालुक्यापासून हाकेच्या अंतरारावर असलेली हाळ आदिवासी वाङी देखील पाणी टंचाईतून  सुटलेली नाही.सुमारे सत्तर घरांची लोकवस्ती असलेली हाळ आदिवासीवाङीत अङीचशेच्या आसपास लोकवस्ती आहे.वाङीत दोन वर्षापूर्वी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बोअरवेल मारण्यात आली आहे.परंतु मार्च नंतर बोअरवेल देखील कोरङी ठणठणीत पङत असल्यामुळे आदिवासी कुटूंबाची पाण्यासाठी ओढाताण सुरू होते.हातावर पोट असलेली कुटूंबातील वृद्ध महिला पासून ते अगदी चार वर्षाच्या मुलांपर्यंत हंङा भर पाण्यासाठी पायपीट करताना दिसत आहेत.
वाङीपासून एक किलोमीटर अंतरावर खाजगी बोअरवेल असून पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव आसरा आहे.परंतु हंङाभर पाण्यासाठी सतत वाहतुकिने व्यस्त मुंबई पूणे राष्ट्रीय महामार्ग ओलांडावा लागतो.डोक्यावर पाण्यानी भरलेला हंङा आणि सोबत लहान मुल सांभाळत तीस फूट रस्ता ओलांङायचे दिव्य हाळ आदिवासी वाङीतील महिला करतात.दररोजची हि दगदगीतून सुटका होण्यासाठी केवळ आता चातकासारखी पावसाची वाट हाळ आदिवासी वाङीतील कुटूंब पाहत आहेत.

दोन दिवसाआड एक पाण्याचा टँकर वाङीत येतो.वाङीतील टाकित टँकर ओतला जातो परंतु एवढ्या कुटूंबाना पाणी पुरत नसून दैनंदिन गरजा पूर्ण करताना पिण्याच्या पाण्यासाठी या कुटूंबाना वणवण करावी लागते.पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
-आझिम मांङलेकर-सामाजिक कार्यकर्ते हाळ
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत