भरतासह ८ देशांना इराणकडून कच्चे तेल घेण्याची अमेरिकेकडून परवानगी

नवी दिल्ली :रायगड माझा ऑनलाईन 

Related image

इराणकडून कच्चे तेल विकत घेण्यास अमेरिकेने हिंदूस्थानला परवानगी दिली आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेने आठ देशांना इराणकडून कच्चे तेल विकत घेण्याची परवानगी दिली आहे, त्यात हिंदूस्थानसह दक्षिण कोरिया आणि जपानचा समावेश आहे.

इराणमधून तेल खरेदी करणारे सर्वाधिक ग्राहक आशिया खंडात आहे. अमेरिकेने बंदी घातल्यानंतरही इराणकडून कच्चे तेल विकत घेण्याची परवानगी आशियाई देशांनी अमेरिकेकडे मागितली होती. याप्रकरणी अमेरिका अधिकृत यादी सोमवारी जाहीर करणार आहे.  चीनच्या अधिकार्‍यांनी अमेरिकेशी संपर्क साधून हिंदुस्थान प्रमाणे त्यांनाही परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे.

इराणकडून सर्वाधिक कच्चे तेल घेण्यात चीनचा पहिला क्रमांक आहे, चीननंतर कच्चे तेल घेण्यात हिंदुस्थानचा क्रमांक लागतो. इराणकडून कच्चे तेल घेण्यास अमेरिका बंदी घालणार आहे. जर या बंदीनंतर कोणत्याही देशाने इराणकडून तेल विकत घेतले तर अमेरिका त्याच्यावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत