‘हिंदू नेते मला प्रचाराला बोलवत नाहीत’ : गुलाम नबी आझाद

उत्तर प्रदेश : रायगड माझा वृत्त 

‘गेल्या चार वर्षांपासून काँग्रेसमधील हिंदू नेते मला प्रचारासाठी बोलावत नाहीत,’ असं वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केलं आहे. अलीगड मुस्लिम विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांच्या एका संमेलनात ते बोलत होते.

धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या राजकारणाचा फटका बसला असल्याची खंत आझाद यांनी यावेळी व्यक्त केली आहे. ‘मी युवक काँग्रेसचा नेता असल्यापासून काँग्रेसच्या विविध निवडणुकांसाठी प्रचार करतो आहे. त्या काळात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक नेते मला प्रचार करायला बोलवायचे. बोलवणाऱ्यांमध्ये हिंदूंचे प्रमाण ९५ टक्के तर मुसलमानांचे प्रमाण ५ टक्के होते. आता फारच तुरळक हिंदू नेते प्रचारासाठी बोलावतात,’ असं त्यांनी सांगितलं. १८५७च्या उठावानंतर ज्या प्रकारे हिंदू आणि मुसलमानांमध्ये फूट पाडण्याचं राजकारण इंग्रजांनी केलं, तेच प्रकार आता सुरू आहेत. काँग्रेसचा एक नेता म्हणून नव्हे तर भारताच्या प्रगतीची आस असलेला एक नागरिक म्हणून मी हे बोलतो आहे,’ असंही ते म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत