हिमाचल प्रदेशमध्ये पूर आणि बर्फवृष्टी, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी

हिमाचल प्रदेश : रायगड माझा वृत्त 

हिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट

हिमाचल प्रदेशमध्ये पुरानं हाहाकार माजवलाय. 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिमला, कुल्लू, सोलन, चंबा, कांगरा आणि सिरमौरमध्ये आज आणि उद्या शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आलेले आहेत. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अनेक धरणांमधली पाणीपातळी वाढली आहे. त्यातून विसर्ग सुरू आहे.

हिमाचलमध्ये आतापर्यंत 126 ठिकाणी भूस्खलन होऊन रस्ताही खचलाय. मंडी, मनाली इथले राष्ट्रीय महामार्ग सुद्धा बंद ठेवण्यात आले आहेत. कुल्लूमध्ये मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. अख्खाच्या अख्खा ट्रकच पुरामध्ये वाहून गेला. सुदैवानं, यात चालक आणि क्लीनर वेळेत खाली उतरले आणि त्यांचा जीव वाचला.

https://twitter.com/ANI/status/1044107656829460480

हिमाचल प्रदेशमध्ये तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. राज्यातील रस्ते जलमय झाल्यामुळे तिथून वाहतूक करणंही शक्य नाहीये. दरम्यान हिमाचल प्रदेशसह आणखी पाच राज्यातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आलीय. तर पावसामुळे या भागात रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय.

मंडी, मनाली इथले राष्ट्रीय महामार्गसुद्धा बंद ठेवण्यात आले आहेत. उत्तर भारतामध्ये आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत शेकडो जनावरं आणि वहानं वाहून गेलीत तर नद्यांनाही पूर आलाय. हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात 2 जणांना लष्करानं चॉपरच्या सहाय्यानं वाचवण्यात यश आलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत