हिम्मत असेल तर मराठी माणसांच्या घराला हात लावून दाखवा!

मुंबई :रायगड माझा 

वांद्र्यातील शासकीय वसाहतीतला मराठी माणूस इथेच राहील, सरकारने इथल्या माणसांना बाहेर काढून दाखवावं, असं आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपला केलं आहे. मुंबईतील वाद्र्यांत ते बोलत होते.

परप्रांतीयांसाठी मराठी माणसाला डावललं जातंय, प्रत्येक राज्यात त्यांच्या माणसांचा पहिल्यांदा विचार केला जातो, असंही ते म्हणाले.

तसंच तुम्हांला कोणीही इथून काढणार नाही तुम्ही इथंच निश्चित राहावं, असं आश्वासन राज ठाकरेंनी शासकीय वसाहतीतल्या मराठी माणसांना दिलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत