हुक्का पार्लरवाल्यांचा पोलिसांनी काढला ‘धूर’, सहा जणांवर गुन्हे

टिटवाळा : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for hukka parlor

आंबिवली येथील ढाब्यावर बेकायदा हुक्का पार्लर चालवणाऱया टोळीचा पोलिसांनी ‘धूर’ काढला आहे. या पार्लरवर धाड टाकली असून सहाजणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल, ढाब्यांवर बेकायदा धंदे करणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.

आंबिवली येथील बाळकृष्ण पेपर मिलजवळील द बॉलीवूड बीच ढाबा येथे राजरोसपणे हुक्का पार्लर चालत होते. याची खबर मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री 9 वाजेच्या सुमारास धाड टाकून कारवाई करण्यात आली. मयूर रेसिडेन्सी कांबा येथे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवरही कारवाई करण्यात आली . आरोपी त्रिलोक पाटील, सूरज विश्वकर्मा, अमित सामरा, रवी मनमाने, राहुल पगारे, निरज गोस्वामी यांच्या वर याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

42 हजारांचे साहित्य जप्त
कारवाईत हुक्का पार्लर मालक असमत जवेर, कल्याण(30) व त्याचे कामगार यांच्यावर सिगारेट व अन्य तंबाखू जन्य उत्पादने कायदा 2003 कलम 4(क), 21(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत बेचाळीस हजार सातशे पन्नास रुपयांच्या हुक्क्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत