हुश्श पास झालो; ४५ टक्के गुण मिळवलेल्या मुलाचा ‘जल्लोष’

महाड: रायगड माझा 

आज शालांत परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ऐंशी नव्वद टक्के गुण मिळवले विद्यार्थ्यां आपल्या यशाचा आनंद  साजरा करीत असतानाच महाडमध्ये कमी गुण मिळवलेल्या एका सामान्य विद्यार्थ्यांने देखील नाउमेद न होता आपल्याला मिळालेल्या या यशाचा आनंद तीतक्याच उत्साहात साजरा केला. ४५ टक्के गुण मिळवलेल्या या विद्यार्थ्यांला आपण दहावी परिक्षेत पास झाल्याचा अक्षरशः आश्चर्याचा धक्काच बसला. या यशस्वी विद्यार्थ्याची त्याच्या मित्रांनी चक्क मोटारसायकल वरुन मिरवणूक काढून आपल्या मित्रांच्या यशाचा आनंद साजरा केला.

प्रथमेश राजेश डोळस असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो महाडमधील कोएसोच्या वि.ह.परांजपे विद्यालयाचा विद्यार्थी आहे. आपल्याला शालांत परिक्षेत ४५ टक्के गुण मिळाल्याची माहिती त्याला समजताच त्याच्या आनंदाला अक्षरशः पारावर उरला नाही.
प्रथमेश पास झाल्याचे माहिती त्याच्या मित्रांना समजताच त्यांनाही अत्यानंद झाल्याचे पहायला मिळाले. त्याच्या मित्रांनी  मोटारसायकलवरुन प्रथमेशची गळ्यात शाल, हार घालून जयघोष चक्क बाजारपठेतून मिरवणूक काढून आपल्या मित्राच्या यशाचा आनंद साजरा केला. प्रथमेश देखील जग जिंकल्याचा आनंद साजरा करीत मिरवणूक नागरीकांना अभिवादन करीत होता. ‘जो जीता वोही सिकंदर’ असा आनंद प्रथमेश च्या चेहऱ्यावर जाणवत होता.

कोएसोचे संचालक दिलीपशेठ पार्टे यांनी प्रथमेशचे पुष्पहार घालून अभिनंदन करीत त्याच्या यशाला दाद दिली. आज शांलांत परिक्षेत ९५ टक्के वा त्याहून अधिक गुण कोणाला मिळाले त्यापेक्षा ४५ टक्के गुण मिळवणाऱ्या प्रथमेशच्या कौतुकाचीच चर्चा महाड शहरात चांगलीच रंगली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत