हृदयविकाराच्या धक्क्यानंतर गोविंदाच्या ३४ वर्षीय भाच्याचा मृत्यू

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

हृदयविकाराच्या धक्क्यानंतर गोविंदाच्या ३४ वर्षीय भाच्याचा मृत्यू

अभिनेता गोविंदाचा भाचा आणि प्रोड्युसर कीर्ती कुमार यांचा मुलगा डम्पी उर्फ जनमेंद्र आहुजा याचा आज सकाळी अचानक मृत्यू झालाय. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानंतर ३४ वर्षीय डम्पीचा मृत्यू झाला. मुंबईच्या वर्सोवा भागात आज सकाळी अचानक छातीत दुखू लागल्यानंतर तो बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळला. रुग्णालयात पोहचण्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला.

कीर्ती कुमार यांचा एककुलता मुलगा असलेल्या डम्पीच्या अचानक जाण्यानं संपूर्ण कुटुंबाला जोरदार धक्का बसलाय. गोविंदा, कृष्णा अभिषेक, रागिनी खन्ना आणि कुटुंबातील इतर सदस्य आहुजा यांच्या वर्सोव्यातील घरी दाखल झालेत.

डम्पीच्या पार्थिवावर आज दुपारी मुंबईच्या पवनहंस स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार पार पडतील.

प्रोड्युसर कीर्ती कुमार यांनी डम्पीला दत्तक घेतलं होतं. डम्पी हा कीर्ती कुमार यांच्या घरी काम करणाऱ्या नोकरांचा म्हणजेच महेंद्र आणि लाली यांचा मुलगा होता. कीर्ती कुमार यांनी आपल्या घरी काम करणाऱ्या लालीसोबत विवाह केल्याचंही म्हटलं जातं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत