हॅकर्सनी पुन्हा केला डेटा लीक, ट्रायच्या अध्यक्षांची वैयक्तिक माहिती ट्विटरवर शेअर

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

ट्रायचे अध्यक्ष शर्मांची आधारला जोडलेली माहिती लीक झालेली नाही असा दावा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (युआयडीएआय)ने केला होता.  आधारने त्यांच्याकडे असेला नागरिकांचा डेटा सेफ असल्याचे सांगितले होते. याला काही तास उलटत नाहीत तोच हॅकर्सनी पुन्हा ट्रायच्या अध्यक्षांची बँकेसंदर्भातील माहिती उघड करुन खळबळ माजवली आहे. हॅकर्सनी ट्रायच्या अध्यक्षांना आर. एस. शर्मांना आधार क्रमांक देवून हॅकर्सना माहिती हॅक करण्याचे आव्हान देणे महागात पडले आहे.

अधिकृत हॅकर्सनी काल ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मांची काही वैयक्तिक माहिती ट्विटरवर शेअर केली होती. यानंतर आधार प्राधिकरणाने(UIDAI) शेअर केलेली माहिती गुगलवर उपलब्ध आहे. त्यामुळे आधार क्रमांकाशी जोडलेली माहिती हॅक केल्याचा दावा आधार प्राधिकरणाने खोडून काढला होता. याला काही तास उलट नाही तोच अधिकृत हॅकर्सनी शर्मा यांच्या पाच बँकांचे खाते क्रमांक, IFSC कोड, पॅन क्रमांक, ई-मेल, घरचा पत्ता, मतदान ओळख क्रमांक, फोन सेवा देणारी कंपनी कोणती आहे, सध्या वापरत असलेल्या मोबाईल कुठल्या मॉडेलचा आहे याची माहिती दिली.

या माहितीबरोबरच हॅकर्सनी त्यांच्या खात्यावर १ रुपया पाठवला. बँक खातेदाराला माहिती नसताना असे पैसे पाठवणे सुरक्षेच्या दृष्टीने घातक असल्याचे ट्विटर युजर्सनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे आधार प्रधिकरण आणि ट्रायचे अध्यक्ष यांची चांगलीच गोची झाली आहे.  पण, हॅकर्सनी उघड केलेल्या माहितीची सत्यता अजून पडताळण्यात आलेली नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत