हेटवणे येथे कबड्डी स्पर्धा उत्साहात

कोलाड : कल्पेश पवार

कोलाड विभागातील हेटवणे येथे जय बजरंग क्रीडा मंडळ यांच्या मार्फत शनिवारी कोलाड विभाग कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कबड्डी स्पर्धेला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

यावेळी समीर शेंडगे(शिवसेना रोहा तालुका प्रमुख) यांच्या हस्ते या सामन्याचे उद्घाटन करण्यात आले .त्यावेळी व्यास पिठावर चंद्रकांत लोखंडे (रोहा उपतालुका प्रमुख), विभावरी अजित तेलंगे(आंबेवाडी सदस्या), आमिर तेलंगे(शिवसेना कोलाड विभाग आधिकारी), राकेश निकम( शाखा प्रमुख हेटवणे) आदी मान्यवर व मोठया संख्येने ग्रामस्त उपस्थित होते .

यावेळी येथे एकूण 24 संघानी सहभाग घेतला होता. त्यात प्रथम क्र. वीर हनुमान संभे A, द्रितीय क्र. जामगाव, तृतीय क्र तुटरोली, व चतुर्थ क्र. सापया वरसगाव A, तर उत्कृष्ट चढाई :-संकेत साळस्कर, पक्कड :-अरुण दळवी, मालिकावीर :-प्रसन्ना सकपाळ ( बाळू ) यांना सन्मानित करण्यात आले, या सर्व विजेत्या संघास रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते गौरविन्यात आले. या स्पर्धेला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला .
ही कबडी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय बजरंग क्रीडा मंडल हेटवणे. सर्व युवक व ग्रामस्थ  मंडल यानि खुप मेहनत घेतली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत