हॉटेल व्यावसायिक नाईट कर्फ्यूच्या निर्णयावर नाराज; शरद पवारांची घेणार भेट

महाराष्ट्र News 24

कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रात्री 11 ते सकाळी 6 या काळात संचारबंदी म्हणजेच नाईट कर्फ्यू लागू केलीये. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर हॉटेल व्यावसायिकांनी नाराजीचा सूर लावलाय. दरम्यान याच कारणास्तव हॉटेल व्यावसायिकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे.

आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी हॉटेल सुरू ठेवण्याची वेळ वाढवून देण्याची मागणी केलीये. हॉटेलं सुरू ठेवण्याची वेळ रात्री 11 पर्यंतची वाढवून दीड वाजेपर्यंत करावी अशी मागणी करण्यात आलीये.

25 डिसेंबर ते 31 डिसेंबर हा हॉटेलच्या व्यवसायाचा काळ असतो. त्यामुळे या याकाळात हॉटेल्स लवकर बंद केल्यास मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागेल, असं हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत