१००व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांची निवड झाली आहे.  हे संमेलन भव्य-दिव्य स्वरूपात मुंबईत साजरे होईल, अशी घोषणा नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी यशवंत नाट्य संकुलात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.

हे संमेलन फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी नियामक मंडळाची सभा झाली. ७ नोव्हेंबर रोजी कार्यकारी मंडळाने डॉ. जब्बार पटेल यांची एकमताने निवड केली होती. तो प्रस्ताव नियामक मंडळाच्या सभेत मान्यतेसाठी ठेवला गेला. त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांची रविवारी एकमताने निवड झाली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत