१०४ डिग्री ताप असूनही ही हरहुन्नरी मराठी अभिनेत्री करतेय चित्रीकरण!

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने इन्स्टाग्रामवर नवरात्री विशेष जे फोटोशूट पोस्ट केलं त्यातला एक फोटो नक्कीच लक्ष वेधून घेतोय. या फोटोत तिच्या हाताला सलाईनची सुई लावलेली दिसतेय. अनेकांना ही सुई कदाचित कॉस्ट्युम्स आणि मेकअपचा एक भाग वाटेल, परंतु असं अजिबात नाहीये. तेजस्विनीची तब्येत सध्या खालावली आहे. आणि हे पाहायला मिळालं ‘ये रे ये रे पैसा’च्या सेट वर! सेटवरचा हा फोटो सध्या सर्वत्र पाहायला मिळतोय ज्यात तेजस्विनी अगदी चादर गुंडाळून बसलीये.

तेजस्विनी सध्या संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. चित्रपटाचं शूटिंग बऱ्यापैकी पार पडलंय, त्यातलं तेजस्विनीचं चित्रीकरण सध्या सुरु आहे. परंतु त्याच दरम्यान ती खूप आजारी पडली, तिला १०४ डिग्री ताप होता आणि त्यामुळे तिला तातडीने दवाखान्यात दाखल करावं लागलं होतं. परंतु केवळ दोन दिवस आराम करून तेजस्विनी पुन्हा एकदा ‘ये रे ये रे पैसा’च्या कामावर रुजू झाली. दरम्यान तेजस्विनीची तब्येत तशी फारशी ठीक नाहीये. तरीदेखील तिने चित्रीकरणात खंड पडू दिला नाहीये. चित्रीकरणात मध्ये मध्ये ब्रेक घेऊन, औषध घेणे, सलाइन लावणे असे उपचार करून ती तब्येत जपायचा प्रयत्न करतेय.

‘ये रे ये रे पैसा’च्या सेटवर तेजस्विनीची खास काळजी घेतली जातेय. तरीदेखील १०४ डिग्री ताप असतानाही या हरहुन्नरी अभिनेत्री ‘ये रे ये रे पैसा’च्या सेटवर तेवढ्याच उत्साहाने काम करतेय हे विशेष.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत