१०८ रुग्णवाहिकेने घेतला अचानक पेट; आदिवासी रुग्णासहित डॉक्टर बचावले

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा तालुक्यासारख्या डोंगराळ व ग्रामीण भागामध्ये रुग्णांसाठी जीवदायी ठरत असलेल्या १०८ रुग्नावाहीकेने रुग्णाला पुढील उपचारासाठी नेहत असताना भररस्त्यामधेच अचानक पेट घेतील.पेट घेतलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाने सतर्कता व तत्परता दाखवल्याने रुग्णवाहिकेमध्ये असणारा रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक व डॉक्टर थोडक्यासाठी बचावले असल्याची घटना म्हसळा तालुक्यात घडली आहे.
या बाबत सविस्तरपणे वृत्त असे की,रवींद्र किसन जाधव  वय २५ वर्षे रा.मेंदडी आदिवाशीवाडी या तरुणाला ३० मे रोजी फुर्सा जातीच्या सापाने दंश केला होता.सापाने दंश केलेला हा तरुण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी विष उतरवण्यासाठी मांत्रिकाकडे गेला होता.मात्र मांत्रिकाकडून विष उतरत नसल्याचे लक्षात येताच त्याच्या नातेवाईकांनी १०८ रुग्णवाहिकेसोबत संपर्क केला.तेथून रुग्णाला पुढील उपचारासाठी म्हसळा शहरातून माणगाव येथे नेहत असताना मौजे देवघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत रुग्णवाहिका आल्यानंतर रुग्नावाहीकेमधून अचानकपणे धूर येण्यास सुरवात झाली.
चालक शरद पाभरेकर याला रुग्णवाहिकेतून येणाऱ्या या धुराबाबत जाणीव झाल्यानंतर चालक पाभरेकर याने रुग्णवाहिकेतून रुग्ण,रुग्णाचे नातेवाईक व डॉक्टरांना सुखरूपपणे बाहेर काढली.या नंतर रुग्नावाहीकेमध्ये असणाऱ्या अग्निरोधक यंत्रणेने आगीवर नियंत्रण मिळवण्यात चालकाला यश आले.चालक शरद पाभरेकर एवढ्यावरच न थांबता त्याने तत्काळ १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावून घेतली व रुग्णाला पुढील उपचारासाठी सुखरूप माणगाव येथे सोडले. चालक पाभरेकर याच्या तत्परतेमुळे रुग्णाला तत्काळ पुढील उपचार मिळाला व त्याचे प्राण वाचले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत