११ वर्षांच्या मुलासमोरच आईची हत्या करून वडिलांची आत्महत्या

सातारा : रायगड माझा वृत्त 

Image result for MURDER

महाबळेश्वरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. संतापाच्या भरात एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची आपल्या ११ वर्षांच्या मुलासमोरच हत्या केली… आपल्या हातून घडलेल्या कृत्याची जाणीव झाल्यानंतर या इसमानं स्वत:ही आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. मृत इसमाचं नाव अनिल सुभाष शिंदे (३४ वर्ष) आहे.

अनिल पत्नी सीमा (३० वर्ष) आणि ११ वर्षांच्या मुलासोबत बुधवारी महाबळेश्वरमध्ये पर्यटनासाठी दाखल झाले होते. परंतु, काल रात्री क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला… हा वाद इतका विकोपाला गेला की अनिलला आपला राग आवरणं कठिण झालं… आणि रागाच्या भरातच अनिलनं ११ वर्षांच्या मुलासमोरच आपल्या पत्नीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार केले… या घटनेत सीमा यांचा जागीच मृत्यू झाला…

त्यानंतर अनिल यांनी स्वत:वरदेखील वार करून आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. आपल्या उघड्या डोळ्यांसमोर घडलेल्या या घटनेनं त्यांच्या मुलाला मात्र धक्का बसलाय. शिंदे कुटुंब हे पुणे जिह्यातील धानोरीच्या विश्रांतवाडीचे रहिवासी आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत