१२ वर्षाच्या मुलाचा ४५ वर्षीय महिलेकडून विनयभंग

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन

मुंबईतील वांद्रे परिसरात एका १२ वर्षाच्या मुलाचा ४५ वर्षीय महिलेकडून लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्‍या तक्रारीवरुन संशीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेला ‘पोस्को’ कायद्याखाली मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पीडित मुलगा आपल्या आईला भेटण्यासाठी वांद्रे परिसरात गेला असता, शेजारी राहणाऱ्या महिलेने या मुलाला घरी बोलावून त्याचा विनयभंग केला. पीडित मुलाने आपल्‍या वडिलांना याबाबत माहिती दिल्‍यानंतर त्‍यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात या महिलेविरोधात तक्रार दाखल केली. हा मुलगा अल्पवयीन असल्याचे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नसून, पुराव्यासाठी लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

वांद्रे पोलिसांनी मुलाचा जवाब आणि त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून या ४५ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने या महिलेची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत