१२ सप्टेंबरला होणार अॅपलच्या तीन नवीन फोनची घोषणा

अॅपल कंपनी या वर्षी लाँच करणाऱ्या फोनचा डिस्प्ले हा पूर्वीपेक्षा अधिक मोठा असणार आहे.

रायगड माझा ऑनलाईन :

Image result for APPLE PHONE PIC

दरवर्षी ‘अॅपल’ आयफोन चाहत्यांना प्रतीक्षा असते ती सप्टेंबर महिन्याची. सालाबादप्रमाणे याच महिन्यात अॅपल कंपनी आपले नवे फोन लाँच करते. यावर्षी १२ सप्टेंबरला अॅपल कंपनी २०१८ मधला नवा फोन लाँच करणार असल्याची चर्चा आहे.

कॉलिफोर्नियामधील अॅपल पार्क कॅम्पसमध्ये १२ सप्टेंबर २०१८ रोजी कार्यक्रम पार पडणार आहे.  कंपनी याच इव्हेंटमध्ये नवा आयफोन लाँच करणार असल्याच्या चर्चा आहेत. ‘iPhone X Plus’ या नावानं सध्या या फोनची चर्चा आहे. अॅपलनं घोषणा केल्यानंतर लगेचच ‘iPhone X Plus’ चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ‘iPhone X Plus’ बरोबरच आणखी दोन हँडसेटही अॅपल या वर्षात बाजारात दाखल करणार आहे.

अॅपल कंपनी या वर्षी लाँच करणाऱ्या फोनचा डिस्प्ले हा पूर्वीपेक्षा अधिक मोठा असणार आहे. सॅमसंग ही अॅपलची प्रतिस्पर्धी कंपनी आहे त्यामुळे या कंपनीला टक्कर देण्यासाठी अॅपलनं नव्या मॉडेल्समध्ये काही खास बदल केले असल्याचं ‘ब्लुमबर्ग’नं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यामुळे आयफोन चाहत्यांनाही या फोनबाबत कमालीची उत्सुकता आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.