१८० तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती; मुख्यमंत्र्यांची घोषणा

 

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अखेर राज्यातील १८० तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा केली आहे. ही दुष्काळसदृश परिस्थिती निवारण्यासाठी फडणवीस यांनी ८ सूत्री कार्यक्रमांचीही घोषणा केली असून त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाल्याचंही स्पष्ट केलं.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. दुष्काळ निवारण्यासाठी चारा छावण्या, टँकरने पाण्याची व्यवस्था आणि विद्यार्थ्यांना शुल्क माफी आदी घोषणाही त्यांनी केल्या. राज्यातील या १८० तालुक्यात केंद्राचं पथक येऊन पाहणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच राज्यात सरासरीच्या केवळ ७७ टक्के पाऊस झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, विरोधी पक्षांकडून सातत्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात होती. भाजपचा सत्तेतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनेही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतानाच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर फडणवीस यांनी आज ही घोषणा केली.

‘या’ आहेत उपाययोजना

>> पिण्याच्या पाण्यासाठी टँकर योजना

>> रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात सूट

>> टंचाईग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडित न करणे

>> शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट

>> जमीन महसुलातून सूट

>> शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थिगिती

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत