‘१ जून नंतर तुला घराबाहेर पडू देणार नाही’, किरीट सोमय्यांना धमकी…

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. आता किरीट सोमय्या यांना धमकी मिळाल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. या संदर्भात त्यांनी मुलुंडचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांना पत्र पाठवून, आवश्यक ती पावलं उचलण्याची विनंती केली आहे.

दोन दिवसांपूर्वी १३ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास व्हॉट्स अॅपवर त्यांना एक मेसेज आला. हा मेसेज मराठीमध्ये होता. ‘१ जून नंतर तुला घराबाहेर पडू देणार नाही, काय करतो बघ. मुलुंडला येऊन सांगतो तुला’ असा तो संदेश होता. हा धमकीचा संदेश पाठवणारा माणूस कोण आहे? ते मी शोधू शकलो नाही. त्यामुळे आरोपीला शोधून काढण्यासाठी जे आवश्यक आहे, ते सर्व करा असे किरीट सोमय्या यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत