२००२च्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपीला अटक

औरंगाबाद : रायगड माझा वृत्त 

2002मध्ये झालेल्या मुंबई घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपीला अखेर औरंगाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएस पथकाकडून ही अटक करण्यात आली आहे. घाटकोपर बॉम्बस्फोटात अब्दुल रहमान शेख हा आरोपी फरार होता. पोलीस त्याचा कसून तपास करत होती. अखरे त्याच्या मुसक्या आवळण्य़ात गुजरात एटीएस पथकाला यश आलं आहे.

आरोपी अब्दुल रहमान शेख हा कैसर कॉलनीत राहणार आहे. त्याचं वय 43 वर्ष आहे. तो 2002 पासून सौदीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. 5 तारखेला तो भारतात आला होता. त्याच्या पत्नीवर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू होते तिला भेटण्यासाठी तो भारतात आला होता. याची खबर गुजरात एटीएस पथकाला लागताच त्याला सापळा रचून पकडण्यात आलं.

घाटकोपर येथे २ डिसेंबर २००२ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या बेस्ट बस डेपोतील बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटामध्ये जवळपास 32 नागरिक, महिला, मुले जखमी झाली होती. या बॉम्बस्फोटामुळे बेस्टसह सार्वजनिक मालमत्तेचे जवळपास ५ लाख ३३ हजार ६५० रुपयांचे नुकसान झालं होतं.

या गुह्यातील ९ जण अजूनही फरार असून त्याचा शोध घेतला जातो आहे. तब्बल १६ वर्षांपासून या गुह्याचा तपास सुरू असून इरफान कुरेशी (४७), रा. शहा कॉलनी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत