२०१९ ची रणनीती तयार करणार मोदी-भागवत-शहा !

नवी दिल्ली: रायगड माझा 

देशातील आगामी निवडणुकांची तयारी सुरू झाली असून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या तयारीला प्रत्येक पक्ष लागला आहे. काँग्रेस या पार्श्वभूमीवर भाजपचे अपयश सांगत आहे, तर भाजप आपली कामे आणि यश जनतेपर्यंत पोहोचवत आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, २८ आणि २९ मे ला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सोबत बसून आगामी निवडणुकीची रणनीती तयार करणार आहेत. या बैठकीत आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि संघाचे जिग्गज सदस्य उपस्थित राहतील. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील या बैठकीत सहभागी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आरएसएस आणि भाजपची गत २०१४ च्या निवडणुकीपूर्वी संयुक्त बैठक झाली होती. नरेंद्र मोदीदेखील या बैठकीत सहभागी झाले होते. महत्वाच्या निवडणुकांपूर्वी, अशा प्रकारची बैठक होत असते. या संयुक्त बैठकीत काही महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत