२०१९ मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर मी पंतप्रधान का बनणार नाही : राहुल गांधी

बेंगळुरू : रायगड माझा 

पाच महिन्यांपूर्वी काँग्रेसचे ६० वे अध्यक्ष बनलेल्या राहुल गांधींनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या वर्षभरापूर्वी राहुल गांधींनी पंतप्रधान बनण्याची तयारी दर्शवली आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात राहुल गांधी म्हणाले की, जर काँग्रेस २०१९  मध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला तर मी पंतप्रधान का बनणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. पण काँग्रेसला आता किती यश मिळणार यावर हे सर्व अवलंबून असणार आहे.

मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार भ्रष्ट का?
– राहुल गांधींनी बेंगळुरूमध्ये समृद्ध भारत फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आलेल्या मोजक्या लोकांनी संबोधित करताना म्हटले की, अमित शहा हत्येच्या प्रकरणातील आरोपी राहिलेले आहे. त्यांच्याकडे फारशी विश्वसनीयता राहिलेली नाही, असे मला वाटते. भारताची जनता हे विसरली आहे की, भाजपाध्यक्ष हत्येचे आरोपी आहेत. जो पक्ष प्रामाणिकपणा आणि विनम्रतेच्या गप्पा करतो त्यांच्याच अध्यक्षावर हत्येचा आरोप आहे.
– आम्ही वारंवार पंतप्रधानांना विचारत आलो आहोत की, त्यांनी अशा व्यक्तीला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार का निवडले  जो तुरुंगात गेलेला आहे आणि भ्रष्टही आहे.

काँग्रेसमध्ये अनेक दिवसांपासून मागणी
– राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवण्याची मागणी २०१२  पासून झालेली पाहायला मिळालेले आहे. त्यावेळी केंद्रामध्ये युपीए-२ ची सत्ता होती. त्यावेळी मनमोहन सिंह हे पंतप्रधान होते. त्यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले होते की, राहुल गांधींनी पंतप्रधान बनावे अशी देशाची इच्छा आहे.
– त्यानंतर सप्टेंबर २०१३  मध्ये म्हणजे निवडणुकीच्या जवळपास सहा महिने आधी मनमोहन सिंग यांनीही २०१४  च्या निवडणुकांनंतर राहुल गांधी हेच पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी पहिली पसंती असतील असे म्हटले होते. राहुल गांधींच्या नेतृत्वात काम करण्यास आनंद वाटेल असेही मनमोहन म्हणाले होते.
– सोनिया गांधींनी मात्र राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवण्याची मागणी फेटाळली होती. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मात्र या मागणीने जोर धरला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत