२०१९-२० या आर्थिक वर्षचा अर्थसंकल्प सादर;पेट्रोल-डिझेल,सोने-चांदी महागणार

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

आज २०१९-२० या आर्थिक वर्षचा अर्थसंकल्प सादर झाला.काय स्वस्त होणार आणि काय महागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमम यांनी अर्थसंकल्पामध्ये अनेक नव्या योजना जाहीर केल्या आहेत.पेट्रोल आणि डिझेल महगणार असून सोने देखील माहगणार असल्याच अर्थमंत्री निर्मला सीतारमम यांनी सांगितले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रतिलिटर दोन रूपये वाढ होणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. सीमा शुल्कातील वाढ १० टक्क्यांवरून १२.५ टक्क्यांपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे सोनं आणि चांदीच्या दरांत वाढ होणार आहे.

लघू उद्योजकांना दिलासा देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे व  अति श्रीमंतांवरचा कर वाढवला आहे. दरम्यान टॅक्स स्लॅबमध्ये त्यांनी कोणताही बदल केलेला नाही.चलनात १ रुपया, २ रूपये, ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपयांचं नाणं आणलं जाणार आहे. अंध व्यक्तींना ही नाणी ओळखता येतील अशा प्रकारची नाणी असणार आहेत अशीही घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजारात त्याबाबत नाराजी पाहण्यास मिळाली आज सकाळी ११२ अंकांनी वधारलेला सेन्सेक्स बजेटनंतर ३३४ अंकांनी कोसळला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत