२३ विमा कंपन्यांकडे १५००० कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा, अद्याप नाही दावेदार

रायगड माझा वृत्त 

नवी दिल्ली – देशभरातील 23 विमा कंपन्यांकडे सद्यस्थितीला 15,167 कोटी रुपयांची रक्कम जमा आहे. त्यावर अद्याप कुणीही दावा केला नाही. विमा कंपन्यांसाठी नियम बनवणारी संस्था भारतीय विमा नियामक आणि विकास मंडळा (IRDAI) ने आपल्या रिपोर्टमध्ये हा खुलासा केला. त्यानुसार, 31 मार्च 2018 पर्यंत भारतीय जीवन विमा कंपनी एलआयसीकडे सर्वाधिक 10,509 कोटी रुपये रक्कम अशी आहे ज्यावर कुणीही दावेदार नाही. तर उर्वरीत 22 कंपन्यांकडे अशा प्रकारची रक्कम 4657.45 कोटी रुपये इतकी आहे.

खासगी विमा कंपन्यांमध्ये ICICI प्रुडेन्शिअलकडे सर्वाधिक 807.4 कोटी रुपये आहेत ज्यावर कुणीही दावा केला नाही. यानंतर रिलायन्स निप्पो जीवन विमाकडे 696.12 कोटी, एसबीआय लाइफकडे 678.59 कोटी आणि एचडीएफसी स्टॅन्डर्ड जीवन विमा कंपनीकडे 659.3 कोटी रुपये आहेत.

कंपन्यांनी रकमेचा पत्ता लावण्यासाठी ग्राहकांची मदत करावी
विमा कंपन्यांनी आपल्या वेबसाइटवर एक सर्चिंग सुविधा द्यावी असे निर्देश IRDAI ने दिले आहेत. या सुविधेवर पॉलिसी होल्डर्स, लाभार्थींना त्यांचे पॉलिसी नंबर, आधार नंबर, पॅन, मोबाइल नंबर आणि जन्म तारीख टाकून आपल्याकडे किती रक्कम आहे याची माहिती मिळवता येईल. सोबतच, दर 6 महिन्याला विमा कंपन्यांनी आपल्याकडे दावा नसलेली रक्कम किती आहे यासंदर्भात अपडेट देत राहावे असेही मंडळाने म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.