२५ वर्षांनंतर आता पुन्हा होणार विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका-विनोद तावडे

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Image result for vinod tawde

गेल्या 25 वर्षांपासून महाराष्ट्रात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका बंद होत्या त्या आता पुन्हा सुरू होणार आहे. १९९१ पासून महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका बंद झाल्या होत्या. पण आता महाराष्ट्रात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहे असल्याची महत्त्वाची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.

एका महाविद्यालयात परिषेदरम्यान हत्या झाली होती त्यानंतर महाविदयालातील या निवडणुका बंद झाल्या होत्या. त्यावर निवडणुका परत सुरू कराव्या असा अहवाल लिंगडोह समितीकडून देण्यात आला होता.

या निवडणुकात महाविद्यालय स्तरावर चार पद असतील. यात महाविद्यालयाचे विद्यार्थी, महाविद्यालयाचे अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, एक राखीव प्रतिनिधी असेल. मतदाना दिवशी इतर महाविद्यालय प्राध्यापकांच्या नियंत्रणात निवडणुका घेण्यात येतील अशी सूचना यावेळी तावडेंनी दिली.

निवडणुकांवेळी महाविद्यालयातील प्राचार्यांचा त्यात हस्तक्षेप नसेल. विद्यापीठ केंद्रात मतमोजणी केली जाईल. त्यामुळं संघर्ष टाळता येणार असल्याचं तावडेंनी सांगितलं. निवडणुकीत सहभाग विद्यार्थ्यांचं वय २५च्या आत हव आहे. त्या विद्यार्थ्यावर कोणताही गुन्हा असता कामा नये. पुढील शैक्षणिक वर्षांपासून या निवडणूक घेण्यात येणार आहे.

दरम्यान, याच वर्षी निवडणुका घेण्यात येणार होत्या पण काही कारणास्तव त्या पुढच्या वर्षापासून घेण्यात येणार असल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. तर या निवडणुकांमुळे विद्यार्थ्यांचे नेतृत्वगुणांना वाव मिळणार आहे. त्यांनादेखील महाविद्यालयीन वर्षात नेतृत्व करण्याची संधी या परिक्षांमधून देण्यात येईल असंही विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत