२७ मिनिटांत हृदय कल्याणहून मुलुंडमध्ये

कल्याण : रायगड माझा वृत्त 

Related image

 

ब्रेनडेड झालेल्या एका ५२ वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्यांचे हृदय, यकृत, मूत्रपिंड व कॉर्निया दान करून सहा जणांना जीवदान दिले. कल्याणमधील फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टरांनी या व्यक्तीच्या कुटुंबीयांना अवयवदानाचे महत्त्व सांगितल्यानंतर त्याच्या कुटुंबीयानी मृत्यूपश्चात अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.

मुलुंडमधील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला हे हृदय देण्याचे निश्चित करण्यात आल्यानंतर पहाटे चार वाजून १० मिनिटांनी ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने २७ मिनिटांत मुलुंडमध्ये पोहोचत रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली. इतर अवयवांचे कल्याणातील त्याच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना प्रत्यारोपण करण्यात आले. शिक्षण, रोजगार, धर्म आणि सामाजिक कल्याण या क्षेत्रांमध्ये माझ्या वडिलांनी सामाजिक कार्य करून नेहमीच लोकांना मदत केली होती. मृत्यूनंतरही त्यांनी स्वतःचा सेवाभाव जपला याचा आम्हांला अत्यंत सार्थ अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रया मयूर यांनी व्यक्त केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत