२ ऑक्टोबरला मुंबई आयआयटीत होणार विश्वविक्रम ,१ लाख विद्यार्थी बनवणार सोलार लॅम्प

मुंबई : रायगड माझा वृत्त 

पवई येथील आयआयटी मुंबईत येत्या २ ऑक्टोबरला गांधी जयंतीदिनी विश्वविक्रम नोंदला जाणार आहे. देशभरातील १ लाख विद्यार्थी ‘स्टुडंट सोलार ऍम्बेसेडर’ कार्यशाळेत एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी ‘सोलार स्टडी लॅम्प’ची असेंब्लिंग (जोडणी) करणार आहेत. ही जगातील सर्वात मोठी सोलार लॅम्प असेंब्लिंग कार्यशाळा आहे. त्यात मुंबईतील १०० शाळांमधील ५ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. कार्यशाळेनंतर विद्यार्थी त्यांनी बनवलेले लॅम्प घरीही घेऊन जाऊ शकणार आहेत.

२०२२ पर्यंत सौरऊर्जेचा १०० टक्के वापर करण्याचे लक्ष्य हिंदुस्थानने ठेवले आहे. भविष्यातील हे लक्ष्य साध्य करण्यासाठी देशातील २८० दशलक्ष विद्यार्थ्यांमध्ये सौरऊर्जेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे, किंबहुना त्या चळवळीतच त्यांना सहभागी करून घेणे ही काळाची गरज बनली आहे. याअंतर्गत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सोलार लॅम्प्सची जोडणी करणार आहेत. त्यासाठी सोलार लॅम्प कीट आयआयटीकडून दिले जाणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत