२ प्रसिद्ध अभिनेत्री देहव्यापाराच्या धंद्यात, अमेरिका पोलिसांचा दावा

 हैदराबाद : रायगड माझा 

दक्षिणेतील नावाजलेल्या २ अभिनेत्री या अमेरिकेत देहव्यापार करीत होत्या असा धक्कादायक खुलासा तिथल्या पोलिसांनी केला आहे. किशन मोदुगुमुडी उर्फ श्रीराज चेनुपती आणि त्याची बायको चंद्रकला हे दोघे दलालाचे काम करीत होते. या दोघांना अटक केल्यानंतर देहव्यापाराच्या धंद्यात अडकलेल्या अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली आहे. यातील दोन अभिनेत्री तर दक्षिणेतील अत्यंत नावाजलेल्या अभिनेत्री आहेत.

अमेरिकेच्या पोलिसांना काही नोटस सापडल्या आहेत. या  नोटसमध्ये या अभिनेत्रींची नावे, सांकेतिक भाषेत लिहलेला पत्ता आणि अभिनेत्रींना मिळणारी रक्कम याचा उल्लेख आहे. श्रीराज हा आधी सिनेक्षेत्रातच काम करीत होता. तिथे झालेल्या ओळखींच्या आधारे तो अभिनेत्रींना विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने अमेरिकेत बोलवायचा. तिथे गेल्यानंतर तो आणि त्याची बायको या अभिनेत्रींना धमकवायचे आणि त्यांच्याकडून देहव्यापार करवून घ्यायचे.

देहव्यापाराच्या दलदलीत अडकलेल्या ५ तरुणींनी अमेरिकेच्या पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रारीमध्ये त्यांनी बंगुळुरू आणि चेन्नईतील दोन सुपरस्टार अभिनेत्रींनाही या जोडप्याने देहव्यापाराच्या दलदलीत ढकलल्याचं या तरुणींनी सांगितलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत