३० जागांवर बंडखोरी कायम

मुंबई: महाराष्ट्र News 24 वृत्त 

राज्यातील एकूण ३० विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपच्या इच्छुकांनी बंडखोरी केल्याने या तीसही जागांवर महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी मैदानात उतरलेल्या शिवसेना-भाजप महायुतीची बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली आहे.

राज्यात शिवसेना-भाजपची युती झाल्याने दोन्ही पक्षातील अनेक इच्छुकांना तिकीट मिळालेलं नाही. वर्सोवामधून विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या भारती लव्हेकर यांना निवडणूक लढवत आहेत. मात्र पटेल यांनी बंडखोरी केल्याने लव्हेकर यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षातील अनेक इच्छुकांनी बंडाचं निशाण फडकावत उमेदवारी अर्ज भरले होते. मुंबईत शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी वर्सोवा मतदारसंघातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काही बंडखोरांना थोपविण्यात शिवसेना-भाजपला यश आले असले तरी एकूण ३० जागांवरील बंडखोरांचं मन वळविण्यात दोन्ही पक्षाला यश आलेलं नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत