३८.८३ लाख नोक-या!, राज्य सरकारचा दावा

(रायगड माझा ऑनलाईन टीम)

राज्य सरकारने आयोजित केलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या गुंतवणूक परिषदेला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद मिळाला. १० लाख कोटी रुपये गुंतवणुकीची अपेक्षा असताना, तब्बल १६ लाख ८८३ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले. यातून ३८ लाख ८३ हजार ४६१ लोकांसाठी रोजगार निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
गुंतवणूक परिषदेत एकूण ४,१०६ करार झाले. त्याद्वारे ३६ लाख ७७ हजार १८५ रोजगारनिर्मितीचे आश्वासन देण्यात आले आहे. याखेरीज सरकारकडून १०४ प्रकल्पांत गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली असून, त्याद्वारे २ लाख ०६ हजार २७६ इतक्या रोजगारांची निर्मिती होणार आहे. या परिषदेच्या समारोपात फडणवीस यांनी सांगितले की, यंदा गुंतवणूक केवळ सामंजस्य करारांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली नाही, तर गुंतवणुकीची इच्छा असलेल्या प्रकल्पांनाही इरादा पत्र देण्यात आले. मराठवाड्यात अधिक गुंतवणूक करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत