३ मुलांची हत्या करून वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न

रायगड माझा वृत्त । नागपूर

 

पोटच्या ३ मुलांची हत्या वडिलांनीच केल्याची धक्कादायक घटना धोतरावाडी येथे घडली आहे. मुलांची हत्या करणाऱ्या वडिलांनी या घटनेनंतर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धोतरावाडी येथे वडिलांनी आपल्या मुलांना आधी विष पाजून ठार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फारसा परिणाम न झाल्याने २ मुलांना शॉक देऊन ठार केले. तर एकाच्या डोक्यात घरातील वरवंट्याने घाव करून ठार केले. या हत्येनंतर त्या पित्याने स्वत: ला इजा करून गळफास लाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

या संपूर्ण प्रकरणात तिनही मुलांचा मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत. विष्णू इंगळे असे या वडिलांचे नाव असून मृतामध्ये अजय, मनोज आणि शिवानी या ३ मुलांचा समावेश आहे.

या प्रकरणाची माहिती शेजाऱ्यांनी बोरगाव मंजू पोलिसांना देऊन देखील पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. आज सायंकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या संपूर्ण घटनेमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत