४ फ्लॅटची किंमत २४० कोटी, उद्योगपतीची घरखरेदी चर्चेचा विषय

 
(रायगड माझा ऑनलाईन टीम)
 
गेल्या काही वर्षातील सगळ्यात मोठ्या किंमतीची घरखरेदी गेल्या महिन्यात बघायला मिळाली. एका उद्योगपतीने नेपियन्सी रोड भागात ४ आलिशान फ्लॅटस २४० कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. तपाडीया कुटुंबाने नेपियन्सी रोडवर उभ्या राहात असलेल्या रुणवाल ग्रुपच्या द रेसिडेंसी या इमारतीमध्ये २८ व्या आणि ३१ व्या मजल्यावर हे फ्लॅटस खरेदी केले आहेत. पर स्क्वेअर फूटचा हिशोब लावायचा झाला तर हा सौदा १.२ लाख प्रति स्क्वेअर फूट या हिशोबाने पार पडला. या चारही फ्लॅटचं क्षेत्रफळ हे प्रत्येकी ४,५०० स्क्वेअरफूट इतकं आहे. ही इमारत जुन्या काळातील आणि आजही प्रसिद्ध असलेल्या किलाचंद हाऊसजवळ बांधण्यात आली आहे.
 
तपाडीया कुटुंब हे फॅमी केअर या गर्भनिरोधकाचे उत्पादन करीत होते, मात्र साधारणपणे ३ वर्षांपूर्वी त्यांनी त्यांचा उद्योग ४,६०० कोटींना विकून टाकला होता. दोन वर्षांपूर्वी याच कुटुंबाने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ६० कोटींना ड्युप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केलं होतं.
 
ज्या इमारतीमध्ये तपाडीया कुटुंबाने फ्लॅट खरेदी केले आहेत त्या जागेवर १९१८ साली बांधलेला नेपिय ग्रँज नावाचा दुमजली बंगला होता. ही जागा रूणवाल समूहाने ३५० कोटींना खरेदी केली होती. यापूर्वीचा महागडा सौदा ३ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ साली झाला होता. जिंदाल ड्रग्जचे निर्मात्या जिंदाल कुटुंबाने अल्टामाऊंट रोडवर १० हजार स्क्वेअरफूटचा फ्लॅट खरेदी केला होता.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत