४ वर्षांत ६७९ सरकारी वेबसाईट हॅक

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन

Image result for hacker

सरकारी वेबसाईट्स इतक्या असुरक्षित आहेत की त्या कोणीही हॅक करू शकतात, हेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटसच्या हॅकिंग घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले.

गेल्या चार वर्षात म्हणजेच २०१४ ते २०१७ या काळात ६७९ सरकारी वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या आहेत. यात नॅशनल इन्फार्मेटिक्स सेंटरने (एनएससी) होस्ट केलेल्या २४८ वेबसाईट्सचा समावेश आहे, असे इंडियन कम्युटर इर्मजन्सी रिस्पॉन्स टीमने (सीईआरटी- इन) ठेवलेल्या ट्रॅकमध्ये आढळून आले होते. यासंदर्भातची माहिती याआधी लोकसभेत देण्यात आली आहे.

‘सीईआरटी- इन’च्या माहितीनुसार, २०१४ मध्ये १५५, २०१५ मध्ये १६४, २०१६ मध्ये १९९ आणि २०१७ मध्ये १६१ सरकारी वेबसाईट्सवर हॅकर्सनी हल्ला केला आहे.
हॅकिंगच्या घटना वाढल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. हॅकर्स सरकारी माहिती चोरून त्याचा दुरुपयोग करत असल्याचे दिसून येत आहे.

ऑडिट करणे गरजेचे…
सायबर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणतीही सरकारी वेबसाईट्स तसेच ॲप्लिकेशनचे होस्टिंग करण्यापूर्वी त्याचे ऑडिट करणे गरजेचे आहे. हे ऑडिट नियमितपणे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सीईआरटी- इन यांनी ५४ सायबर सुरक्षा संघटनांना हे काम दिले आहे. तरीही हॅकर्सकडून सायबर सुरक्षा यंत्रणा तोडून सरकारी माहिती चोरली जात आहे. याचाच अर्थ सुरक्षा उपाय कमजोर असल्याचे दिसून येते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.